छत्तीसगड विद्युत मंडळासह बॅँकेची ९ लाखाची फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:30 PM2020-06-08T19:30:58+5:302020-06-08T19:31:31+5:30
रायपूर येथील सी सी खात्यात ८ लाख ८० हजार ९२९ रुपयांचा बनावट धनादेश जमा केला. त्यातील ८ लाख ७९ हजार ६६५ रूपयांची रक्कम काढून घेत अपहार केला.
नाशिक : बनावट धनादेशाद्वारे दोन चोरट्यांनी छत्तीसगड विद्यूत वितरण कंपनी तसेच कंपनीचे खाते असलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेची ९ लाख १६ हजार २०० रूपयांची फसवणुक केली आहे. सबंधीत बँकेचे क्लीअरन्स कार्यालय नाशिकला असल्यामुळे या फसवणूकप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅँक व अभ्युद्य बँक कॅनडा कॉर्नर शाखेचे व्यावस्थापक राजभोज यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशियत करिष्मा मनुभाई सेलवाडीया याने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को आॅप बँकेच्या कॅनडा कॉर्नर येथील शाखेसह त्याचा छत्तीसगड राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन बॅँक आॅफ इंडियाच्या पुराणी वस्ती लिला चौक, रायपूर येथील सी सी खात्यात ८ लाख ८० हजार ९२९ रुपयांचा बनावट धनादेश जमा केला. त्यातील ८ लाख ७९ हजार ६६५ रूपयांची रक्कम काढून घेत अपहार केला.
तर दुसऱ्या एका प्रकरणात अशाच पध्दतीने दुसरा संशियत गणपत रावजी गायकवाड याने त्याचा अभ्युद्य बँकच्या कॅनडा कॉर्नर शाखेत पुन्हा छत्तीसगढ राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन बँक आॅफ इंडियाच्या रायपुर येथील शोखतुन १९ लाख ५० हजार ९३० रूपयांचा बनावट चेक करून स्वत:च्या खात्यावर वटविला. यातील रकमेचा अपहार सुरू असल्याचे लक्षात येताच बॅँकेकडून सदर खाते तत्काळ गोठविण्यात आले; मात्र तोपर्यंत संशयिताने ३५ हजार ३४९ रुपयांचा अपहार केलेला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूकीचे हे दोन्ही प्रकार लक्षात आल्यानंतर छत्तीसगढ विद्यूत वितरण कंपनी व बँकेने चौकशी केली. अंतर्गत चौकशीनंतर अखेर पंजाब व महाराष्ट्र को आॅप बंकेचे क्लिअरींग हाऊस नाशिक येथे असल्याने व येथून ते चेक पुढे पास करण्यात आल्याने या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक संदिप पवार करत आहेत.