बॅँका फुल्ल...

By admin | Published: November 10, 2016 10:57 PM2016-11-10T22:57:20+5:302016-11-10T23:25:27+5:30

वणी : ग्राहकांची उशिरापर्यंत गर्दी

The bank is full ... | बॅँका फुल्ल...

बॅँका फुल्ल...

Next

वणी : ५०० व १०००च्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी विविध बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी व बदलून घेण्यासाठी झुंबड उडाल्याने बँकांना यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळी १० वाजता वणी मर्चण्ट बँकेचे कामकाज सुरू झाले अनेक खातेदारांनी मोठ्या नोटा जमा करण्यास गर्दी केली होती. सुरळीत कामकाज उशिरापर्यंत सुरू होते.
नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेत नोटा जमा करण्यासाठी गर्दी झाली असताना खातेदारांना दहा हजारांपर्यंत रक्कम बदललेल्या नोटाच्या स्वरूपात अदा करण्यात आल्या. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे कामकाज निर्धारित वेळेत सुरू न झाल्याच्या तक्र ारी होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला नाही. मुख्य शाखेतून रक्कम कमी आल्याने मात्र दोन हजार रुपये प्रती खातेदाराला बदलवून देण्यात आले. व्यवस्थापक व रोखपाल या दोघांनी सेवा देण्यात अग्रक्रम दिला मात्र महिला अधिकारी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खातेदाराना मनस्ताप सहन करावा लागला. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत प्रचंड गर्दी खातेदारानी केली होती.(वार्ताहर)

Web Title: The bank is full ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.