कर्जदाराकडून बॅँकेला अडीच कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:20 PM2019-02-19T22:20:02+5:302019-02-19T22:22:31+5:30
नाशिक : दोन वर्षांपूर्वी वेगवेगळी पंधरा वाहने खरेदी करण्यासाठी मेहेर सिग्नलवरील इंडियन बॅँकेच्या शाखेतून एकाच कुटुंबातील तिघा कर्जदारांनी सुमारे अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकाश गोविंद हेडाऊ (५४, रा. कॅनडा कॉर्नर) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निशांत प्रकाशचंद्र भुतडा, प्रकाशचंद्र गंगाबिशन भुतडा आणि सरिता निशांत भुतडा (तिघे रा. गंगापूर रोड) यांनी २०१७ साली बॅँकेच्या वरील शाखेतून १५ वेगवेगळी वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरण केले होते. त्यानुसार बँकेने त्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. सुरुवातीस भुतडा यांनी कर्जाचे हप्ते भरले. मात्र भुतडा यांनी नवीन वाहन खरेदी केलेले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे संशयितांनी वाहन खरेदीच्या नावाखाली कर्ज प्रकरण केले; मात्र वाहन खरेदी न करता कर्ज घेत कर्जाची परतफेडही केली नाही. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.