बँकांचे रविवारीही कामकाज

By admin | Published: March 27, 2017 12:34 AM2017-03-27T00:34:33+5:302017-03-27T00:34:52+5:30

नाशिक : रिझर्व्ह बँकने २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशातील सर्व खासगी आणि सरकारी बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सरकारी बँकांसह काही खासगी बँकांनीही रविवारी दिवसभर कामकाज सुरू ठेवले.

Banks also work on Sundays | बँकांचे रविवारीही कामकाज

बँकांचे रविवारीही कामकाज

Next

नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकने येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशातील सर्व खासगी आणि सरकारी बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सरकारी बँकांसह काही खासगी बँकांनीही शनिवारी, रविवारी दिवसभर कामकाज सुरू ठेवले. ज्या बँकांमध्ये शासकीय कर भरणा व अन्य आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी आहे, अशाच बँकांनी रविवारी कामकाज केले असून, त्यासाठी कर्मचारी वर्गही मर्यादित असल्याने रोज होणारे कोणतेही सर्वसाधारण व्यवहार झाले नाही. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रसिद्धीपत्रात येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान येणाऱ्या सर्व सार्वजनिक सुट्या रद्द करून बँक ग्राहकांसाठी सुरू ठेवा असे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयाला देशातील अनेक बँकांनी होकार दर्शवत शनिवारी व रविवारीही बँका सुरू ठेवण्याचे आदेश प्रत्येक शाखेला दिले असले तरी बहुतांशी बँकांच्या सरकारी कर भरण्याचे अथवा इतर व्यवहार करणाऱ्या शाखा सुरू असल्याचे दिसून आले. यात स्टेट बँके च्या शनिवारी सर्व १४ शाखा सुरू होत्या, तर रविवारी १० ते १२ शाखाच सुरू राहिल्या. बँक आॅफ महाराष्ट्रच्याही १८ ते १६ शाखा सुरू होत्या, तर खासगी बँकांच्या मात्र केवळ सरकारी करभरण्याचे व अन्य कामकाज करणाऱ्या शाखाच सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, बँका शनिवार-रविवारी सुरू असल्याने रोखीचे व्यवहार करणारे ग्राहकच बँकांमध्ये येत नसल्याने काही बँकांनी अर्धवट शटर बंद करून काम केले, तर काही बँकांचे पूर्ण शटर खाली करून सर्वसाधारण वापराचा दरवाजा सुरू ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)
गतवर्षी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे देशात कॅशलेस व्यवहार मोठ्याप्रमाणत झाले आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षासाठी देशातील रोखीच्या व्यवहारांबरोबरच आॅनलाइन व्यवहारांचीही माहिती बँकांजवळ असणे महत्त्वाचे आहे.
४नागरिकांनी केलेल्या सर्व आॅनलाइन व्यवहारांची सर्व माहिती व्यवस्थितरीत्या मांडण्यासाठी तसेच नागरिकांनाही मार्च महिन्याच्या शेवटी आपले सर्व आर्थिक व्यवहार व्यवस्थितरीत्या पूर्ण करता यावेत यासाठी १ एप्रिलपर्यंत बँका खुल्या ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

Web Title: Banks also work on Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.