लाख रुपयांहून अधिक व्यवहारांवर बॅँकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:57 PM2019-03-16T22:57:37+5:302019-03-17T00:26:36+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शी व निर्भीड वातावरणात पार पडाव्यात त्यासाठी उमेदवार वा ...

Bank's focus on more than Rs | लाख रुपयांहून अधिक व्यवहारांवर बॅँकांचे लक्ष

लाख रुपयांहून अधिक व्यवहारांवर बॅँकांचे लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देलीड बॅँकेच्या सर्वांना सूचना : बॅँकांनाही आचारसंहिता

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शी व निर्भीड वातावरणात पार पडाव्यात त्यासाठी उमेदवार वा त्यांच्या राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे व वस्तुंच्या स्वरूपात भेट देण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असल्याने अशावेळी निवडणुकीच्या काळात पैशांचा वापर टाळण्यासाठी बॅँकांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर बॅँकांनी आपल्या दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवतानाच, पैशांचे वहनावर काळजी घेऊन एक लाखापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार करणाऱ्या खातेदाराची स्वतंत्र माहिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व बॅँकाचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्टÑ सहकारी बॅँकेने यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व राष्टÑीयीकृत व सहकारी बॅँकांना याबाबत लेखी सूचना दिल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडून त्याचे निकाल जाहीर होईपर्यंत बॅँक अधिकाऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
शिवाय बॅँकेतून नेण्यात येणाºया पैशांबाबतचे अधिकृत पत्र सक्षम अधिकाºयाचे घ्यावे तसेच सदरचे कागदपत्रे अधिकाºयाच्या सील बंद नेण्यात यावे, या पत्रांमध्ये किती रक्कम नेली जात आहे, त्यातील नोटांचे विवरणपत्र सादर करण्यात यावे, बॅँकेतून पैसे घेऊन जाताना बॅँकेने ठरवून दिलेल्या मार्गावरून वाहनाद्वारे पैसे नेण्यात यावे, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळापैसा वापरला जाण्याची शक्यता असून, हा पैसा मनीलॉण्डरिंगच्या माध्यमातून बॅँकांमध्ये संशयास्पदरीत्या भरला जाईल त्याबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, असे व्यवहार होत असल्यास त्या खात्यावर व त्याची हाताळणी करणाºया व्यक्तीची माहिती गोळा करावी व त्याबाबत तत्काळ तशी सूचना वरिष्ठांना देण्यात यावी, अ‍ॅण्टी मनीलॉण्डरिंग अलर्टचा बॅँकेने गंभीरपणे विश्लेषण करावे, अशी सूचना करून प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी स्वतंत्र खाते उघडण्याची सक्ती आहे.
अशा वेळी या खात्याचे केवायसी करावे त्याचबरोबर बॅँकेत एक लाख रुपयांपैक्षा अधिक रकमेचा भरणा करणारे अथवा एका खात्यातून अनेक खात्यांमध्ये एक लाखाहून अधिक रुपये आरटीजीएस, एनईएफटीद्वारे हस्तांतरण केले जातील तर अशा व्यवहारांवरही लक्ष ठेवून त्याची स्वतंत्र नोंद ठेवण्यात यावी, असेही लीड बॅँकेने म्हटले आहे.
नोंद ठेवणे बंधनकारक
प्रामुख्याने बॅँकेच्या दैनंदिन व्यवहारानंतर जमा होणारी रक्कम प्रमुख बॅँकेत भरणा करण्यासाठी जाणाºया कर्मचाऱ्यांनी बॅँकेतील रकमेची नोंदणी करावी तसेच कोणता कर्मचारी सदरची रक्कम घेऊन कोठे जाणार आहे याची नोंद ठेवणे बंधनकारक असून, त्यासाठी अशा कर्मचाºयांकडे स्वत:चे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

Web Title: Bank's focus on more than Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.