आदिवासी भागातील बँका आऊट आॅफ रेंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 07:41 PM2019-07-04T19:41:28+5:302019-07-04T19:42:12+5:30
पेठ : ऐन शेतीकामाच्या गडबडीत आदिवासी शेतकरी गुंतला असतांना पेरणी व लावणीसाठी पैशांची गरज म्हणून बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेठ सह करंजाळी व कोहोर येथील बँकासमोर तासनतास रांगा लाऊन ताठकळत ऊभे राहण्याची वेळ आली असून यामुळे ग्राहकांचे ऐन पावसाळ्यात हाल सोसावे लागत आहेत.

पेठ तालुक्यात पेठ, करंजाळी व कोहोर या तीनच गावांना बँकाची सुविधा असून या ना त्या कारणाने बँक व्यवहार सतत ठप्प होण्याचे प्रकार वाढत आहेत. आदिवासी शेतकरी वर्षभर मजूरी करु न बी बियाणे खरेदी साठी काही रक्कम बँकेत जमा करतात. आता पेरणी व भात लावणीची वेळ आल्याने बी बियाणे व खते खरेदीसाठी पैसे आवश्यक असल्याने शेतकर्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असून इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने बँकाची स्थिती बिकट झाली आहे. अनेक ग्राहकांना तासनतास रांगेत ऊभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
आदिवासी विकास परिषदेचे निवेदन
पेठ येथील बँक आॅफ महाराष्ट्राचे ठप्प झालेले व्यवहार व ग्राहकांचे होणारे हाल याबाबत आखील भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शाखाधिकार्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. बँकेच्या तांत्रिक समस्या सोडवून ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी या मागणीचे निवेदन शाखाधिकारी प्रशांत कुमार सिंग यांना देण्यात आले. याप्रसंगी गणेश गवळी, हरिदास भुसारे, ओमकार भोये, राजेंद्र बोरसे, भूषण चौधरी, मनोहर भोये, महेश गवळी आदी उपस्थित होते.
पेठ येथील बँकेसमोर ग्राहकांची लागलेली रांग तर दुसर्या छायाचित्रात शाखाधिकारी प्रशांत कुमार सिंग यांना निवेदन देतांना गणेश गवळी, हरिदास भुसारे, ओमकार भोये, राजेंद्र बोरसे, भूषण चौधरी आदी.