शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅँकांनी कर्ज वळते करू नये :  देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:40 AM2019-05-11T00:40:36+5:302019-05-11T00:41:15+5:30

नाशिक जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे त्या तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाºया अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत, त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बॅँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले.

Banks should not be lending a debt to farmers' subsidy: Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅँकांनी कर्ज वळते करू नये :  देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅँकांनी कर्ज वळते करू नये :  देवेंद्र फडणवीस

Next

नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे त्या तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाºया अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत, त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बॅँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी ‘आॅडिओ ब्रिज सिस्टीम’द्वारे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३५ सरपंचांशी मोबाइलवरून थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाई संदर्भातील प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. या संवाद सत्रात तालुक्यांतील विविध भागातील सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी गावातील पाणीटंचाई, चाºयाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाºयांना दिल्या. यावेळी नांदगाव तालुक्यातील बाबासाहेब जाधव यांनी ४२ गाव पाणीपुरवठा योजनेबाबत समस्या मांडली होती. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी करावी आणि त्याचबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुष्काळी उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, जिल्ह्णात सुमारे ९० टक्के शेतकºयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्णात सुरू असलेल्या सर्व टॅँकर्सचे जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येत आहे. चारा छावण्यांबाबत सात प्रस्ताव प्राप्त झाले असून, दोन मंजूर करण्यात आले आहेत, तर उर्वरित तातडीने मंजूर केले जातील. धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत आदेश काढण्यात आले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्णातील उपाययोजना
* नाशिक जिल्ह्णातील बागलाण-३७, चांदवड-१३, दिंडोरी-१, देवळा-१३, इगतपुरी-४, मालेगाव-४७, नांदगाव-६१, पेठ-२, सुरगाणा-५, सिन्नर-५६, त्र्यंबकेश्वर-२, येवला-४२ असे एकूण २८३ टँकर सुरू आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त ६१ टँकर सुरू असून, दिंडोरी तालुक्यात १ टँकर सुरू आहे.
* पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ नाशिक जिल्ह्णात १५ विंधनविहिरी व १२२ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
* पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची ६.२१ कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे व सर्व नळ पाणीपुरवठ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
* नाशिक जिल्ह्णात एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. मागणीनुसार छावण्या त्वरित सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, नाशिक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी चारा छावणी चालकांना स्वत:च्या जागा नाहीत त्यांना शासकीय जागेवर छावणी उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
* नाशिक जिल्ह्णातील दुष्काळ घोषित केलेल्या ८ तालुक्यांतील ९३० गावांतील ४ लाख ८० हजार ५८९ शेतकºयांना २४९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
* नाशिक जिल्ह्णातील एकूण २८,८९३ शेतकºयांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी १४.८० कोटी अदा करण्यात येणार असून, त्यापैकी ५ कोटी इतकी रक्कम ११,८८० शेतकºयांना अदा करण्यात आली आहे.
* प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्णातील ५.२० लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १.०६ लाख शेतकºयांना २००० प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण २१.३४ कोटी इतके अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्णात १०८६ कामे सुरू असून, त्यावर ४१ हजार मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त ११८६ मजूर येवला तालुक्यात असून, सर्वात कमी १२२ मजूर उपस्थिती सिन्नर तालुक्यात आहे. जिल्ह्णामध्ये १६,९५० कामे शेल्फवर आहेत.
आचारसंहिता अडसर नाही
तहसीलदारांनी गावातील २०१८ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पाहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेवू नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Banks should not be lending a debt to farmers' subsidy: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.