पाच दिवस बँका राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:25 AM2021-03-11T01:25:21+5:302021-03-11T01:25:27+5:30

ॲडव्हान्स टॅक्स भरण्यामध्ये येणार अडचणी

Banks will be closed for five days | पाच दिवस बँका राहणार बंद

पाच दिवस बँका राहणार बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक : आपल्याला बँकांची काही महत्वाची कामे करावयाची असल्यास ती शुक्रवारीच करावी लागणार आहेत. कारण आजपासून पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. गुरूवार दि. ११ रोजी महाशिवरात्र असल्याने बँकांना सुटी आहे. त्यानंतर दुसरा शनिवार व रविवार असल्याने बँकांना सुटी असेल.

सोमवार व मंगळवार हे दोन दिवस बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे शुक्रवारचा वगळता पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. 

ॲडव्हान्स टॅक्स भरण्यामध्ये येणार अडचणी
ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ही १५ मार्च असून त्यादिवशी बँकांचा संप असल्याने हा टॅक्स भरण्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. ज्या करदात्यांच्या कराची रक्कम १० हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक असते, त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरणे बंधनकारक असते.

Web Title: Banks will be closed for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.