बंदी बांधवांच्या वस्तू दर्जेदार
By admin | Published: October 29, 2016 11:52 PM2016-10-29T23:52:27+5:302016-10-29T23:52:56+5:30
रवींद्र सिंघल : कैद्यानी तयार केलेल्या वस्तंूचे प्रदर्शन
नाशिकरोड : बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तू दर्जेदार व टिकाऊ असून, बंदी बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिकांनी कारागृहाच्या प्रदर्शनातून खरेदी करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी बनविलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी सिंघल बोलत होते. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रगती केंद्रात बंदी बांधवांनी बनविलेल्या खुर्च्या, टेबल, टॉवेल, साबण, डिटर्जंट, चौरंग, फिनेल, अॅसिड, कापडी आसन, खारी, टोस्ट आदि विविध वस्तुंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, कारागृह उपअधीक्षक वैभव आगे, प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरूंगाधिकारी कैलास भवर, दीपा आगे आदि मान्यवर उपस्थित होते. बंदी बांधवांनी बनविलेल्या विविध वस्तुंची सिंघल व इतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यांच्या कलाकुसरीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जयंत जाधव, दत्ता म्हस्के, विठ्ठल गायकवाड, शाम देशपांडे, संदीप तांबे, प्रकाश पंडित, बी.व्ही. जाधव, एस.जे. पुसे आदिंसह बंदी बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)