बापट हे लोकोत्तर कवी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:20+5:302021-08-01T04:14:20+5:30
नाशिक : सामाजिक चळवळीत आणि साहित्य संस्कृतीला गती देण्याचे काम बापटांच्या साहित्याने केले. बापट हे कुसुमाग्रजांच्या कुळातील कवी होते, ...
नाशिक : सामाजिक चळवळीत आणि साहित्य संस्कृतीला गती देण्याचे काम बापटांच्या साहित्याने केले. बापट हे कुसुमाग्रजांच्या कुळातील कवी होते, असे विचार लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांनी कविवर्य वसंत बापट जन्मशताब्दी, लोकमान्य टिळक पुण्यस्मरण आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संयुक्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते होते. पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, राष्ट्रसेवा दलाचे वसंत एकबोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीकांत बेणी यांनी कवी वसंत बापट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड.भानुदास शौचे व सहायक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी केले. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष संजय करंजकर, वसंत खैरनार, उद्योजक उत्तमराव शिंदे, शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख संजय चव्हाण, राष्ट्रसेवा दलाच्या अलका एकबोटे, डॉ. बापू देसाई, योगाचार्य अशोक पाटील, दलित मित्र यु.के.अहिरे, यांच्यासह सावाना सेवक वर्ग आदी उपस्थित होते.