नेमिनाथ जैन विद्यालयात शाडुमाती गणेशमुर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:56 PM2018-09-07T17:56:39+5:302018-09-07T17:57:07+5:30
चांदवड - पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.हा संदेश विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावा या हेतुने श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पर्यावरण पुरक शाडूमाती पासुन गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली.
चांदवड - पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.हा संदेश विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावा या हेतुने श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पर्यावरण पुरक शाडूमाती पासुन गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली.या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते नववी च्या एकूण १४० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाडक्या गणपती बाप्पाच्या सुबक मुर्ती साकारल्यात. कार्यशाळेचे हे आठवे वर्ष असून विद्यार्थ्यांना कलाशिक्षक के.व्ही.अहिरे यांनी मार्गदर्शन केले.यात पाणी व शाडू मातीचे प्रमाण लक्षात घेऊन गोळा कसा तयार करावा,त्या गोळ्या पासुन गणेशमुर्तीचे आधी आसन, मांड्या, पाय, पोट, डोके, सोंड ,कान इत्यादी अवयव तयार करण्याचे बांबुच्या कोरण्यांपासुन माती काढून गुळगुळीतपणा देणे असे प्रात्यक्षिके के.व्ही.अहिरे यांनी दाखविलेत तसेच वाढत्या प्लास्टर आॅफ पँरीसच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर बराच काळ मुर्त्या या पाण्यात जशाच्या तश्याच राहतात त्या लवकर विरघळत नाहीत यामुळे मोठ्या स्वरु पात जलप्रदूषण होते. मुर्त्यांचे अवशेष शिल्लक राहतात हे सर्व टाळायचे असेल तर शाडूमातीचाच गणपती बसवावा जेणेकरु न विसर्जनानंतर या मातीचा पुर्नवापरही करणे शक्य आहे आणि प्रदुषणही होत नाही हे देखील सांगितले . कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतुन आकर्षक गणेशाची पाटावर -सिंहासनावर बसलेल्या, मुकूट, फेटा,पगडी ,चंद्र कोर घातलेल्या तसेच नागधारी, जय मल्हार ,बाल गणेश अशा आकर्षक गणेशाची विविध रु पे साकारलीत. तयार झालेल्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी शाळेतच जमा केल्यात व दोन दिवसांनी या मूर्ती सुकल्यावर त्यांना छान जलरंग देऊन रंगकाम पुर्ण केले विद्यर्ा्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या या मूर्ती ते घरीच बसविणार आहेत.या कार्यशाळेत आकर्षक मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. कार्यशाळेसाठी आर.एन.नेरकर, आर.एस.सोनवणे ,एन.एन.निकम यांचे सहकार्य लाभले तर प्राचार्य सौ.संगिता.आर.बाफणा, उपमुख्याध्यापक एस.यु.समदडीया , विभाग प्रमुख सी.डी.निकुंभ ,पर्यवेक्षक एम.टी.सोनी.आर.एम.पवार, व सर्व शिक्षक शिक्षिका व उपस्थित पालकांनी कौतुक केले.