सिडकोत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:01 AM2017-08-26T00:01:43+5:302017-08-26T00:01:57+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागांत गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. यंदा लहान व मोठे मंडळ मिळून शंभर सार्वजनिक मंडळांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून, यात तीन मौल्यवान मंडळांचा समावेश आहे.
सिडको : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागांत गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. यंदा लहान व मोठे मंडळ मिळून शंभर सार्वजनिक मंडळांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून, यात तीन मौल्यवान मंडळांचा समावेश आहे. सिडको तसेच अंबड भागात यंदाच्या वर्षी काही मंडळांनी धार्मिक व पौराणिक देखावे सादर करीत असून, काही मंडळांनी मात्र देखाव्यासाठी खर्च न करता जमा झालेली वर्गणी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच यंदा इको फ्रेंडली गणेशउत्सव साजरा करण्यावरदेखील काही मंडळांनी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले, तर काही मंडळांनी सामाजिक देखाव्यांबरोबरच पर्यावरण रक्षणाचे देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. एकूणच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री गणरायाचे सिडको-अंबड भागांत मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. सिडको व अंबड भागांतील लहान व मोठ्या अशा एकूण शंभर सार्वजनिक मंडळांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सिडको वसाहत मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, शिवराज युवक मित्रमंडळ, राजे संभाजी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळ, शिवसाई सामाजिक विकास संस्था, सिद्धटेक मित्रमंडळ, पेलिकन बहुउद्देशीय संस्था, शिवरत्र मित्रमंडळ यांसह शंभर मंडळांनी सहभाग नोंदविला आहे.