बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:53 AM2022-09-28T10:53:37+5:302022-09-28T10:57:14+5:30

नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली.

BAPS Grand Procession; Kumbhanagari was filled with the shouts of Swaminarayan, Pranapratistha today in the presence of the CM Eknath shinde | बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

googlenewsNext

राजू ठाकरे -

नाशिक
- बीएपीएस स्वामिनारायण मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत मंगळवारी नाशिक शहरातून भव्य नगर शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला. शोभायात्रेत भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या चलचित्ररथांसह जेष्ठ साधू संत, मंहत व हरिभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यावेळी काही कलावंतानी मानवी मनोरे तयार करून भारतीय लोककलेचे दर्शन घडवले. भव्यनगर शोभायात्रेत सहभागी हरीभक्तांनी केलेल्या स्वामीनारायणाच्या जयघोषाने नाशिक नगरी दुमदुमली होती.

नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. यावेळी, पूज्य साधू भक्तीप्रिय दास, पूज्य साधू यज्ञेश्वर दास, पूज्य साधू प्रेमप्रकाश दास, पूज्य साधू घनश्याम दास, पूज्य साधू नारायणभूषण दास, पूज्य साधू क्रिष्णवल्लभ दास, पूज्य साधू क्रिष्णप्रिय स्वामी, भाजप शहाराध्यक्ष गिरीष पालवे, विपुल मेहता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, सुनील रोहकले आदी मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगेही सोडण्यात आले आणि मग शोबायात्रेला सुरुवात झाली.

सहभागी बारा चित्ररथांनी वेधले लक्ष..
- नगर शोभायात्रेत सहभागी अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या पालखीसह श्री गुणातीत गुरूपरंपरा,  लक्ष्मी नारायण देव, विठ्ठल रखुमाई,  गणेश भगवान,  हमुमान , शिव पार्वती, सिंह रथ, मयुर रथ, गज रथ व अश्व रथ अशा बारा वेगवेगळ्या चित्ररथांनी नाशिककरांचे वेधले लक्ष.
- पाचशेहून अधिक महिलांनी यावेळी मंगल कलशयात्रेत सहभाग घेतला तर अनेक महिलांनी स्वामीनारायण देवाचे वचनामृत ग्रंथ घेतले डोक्यावर. 
- सर्जा राजाची बैलजोडी, देवदेवतांच्या वेषातील लहान बालके, आदिवासी नृत्याचा कलाविष्कार, विविध राज्यांतील वेशभूषा, भारत माता वेशभूषेतील भक्त यांसह शिस्तबद्ध निघालेल्या महिला - पुरूषांच्या मोटरसायकल रेलीने विविधतेत एकतेचे घडविले दर्शन.
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे व प्रकट ब्रह्मस्वरूप महंतस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत आज बुधवार (दि.28) बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात वेदोक्त मूर्तीप्रतिष्ठाविधी होणार असून नाशकातील हरीभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साधू भक्तिप्रियदास ( कोठारी स्वामी) व साधू अभयस्वरूपदास, साधू महाव्रतदास, तीर्थस्वरूप स्वामी आदींनी केले आहे.

Web Title: BAPS Grand Procession; Kumbhanagari was filled with the shouts of Swaminarayan, Pranapratistha today in the presence of the CM Eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.