बीएपीएसचा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञ; प्रार्थना व मंत्रोच्चाराने मूर्तींना देवत्व प्राप्त - महंत स्वामी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:29 AM2022-09-27T08:29:07+5:302022-09-27T08:33:19+5:30

यावेळी चारही वेदांचे पठण करण्यात आले. यज्ञ हा एक पवित्र वैदिक विधी असून या दरम्यान सहभागी हरिभक्तांकडून संस्कृत मंत्रांचा जप केला जातो, म्हणून यज्ञ अग्नीत अर्पण करतात.

BAPS Vishwashanti Mahayagya for the welfare of the world; Idols attain divinity through prayer and chanting says Mahant Swami Maharaj | बीएपीएसचा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञ; प्रार्थना व मंत्रोच्चाराने मूर्तींना देवत्व प्राप्त - महंत स्वामी महाराज

फोटो - बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर आयोजित विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात पुजा विधी करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण व पत्नी भारती गमे यांसह हरीभक्त.

googlenewsNext

राजू ठाकरे -

नाशिक : पंचवटीतील स्वामीनारायण मंदीरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव सुरू असून प्राणप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत आज (दि. २६) जगात शांती प्रस्थापित व्हावी, देश प्रगतशील बनावा, भारताच्या सर्व राज्यांत एकता व बंधुता कायम नांदावी याउद्देशाने जगाच्या कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी चारही वेदांचे पठण करण्यात आले. यज्ञ हा एक पवित्र वैदिक विधी असून या दरम्यान सहभागी हरिभक्तांकडून संस्कृत मंत्रांचा जप केला जातो, म्हणून यज्ञ अग्नीत अर्पण करतात. यज्ञा दरम्यान केल्या जाणार्‍या प्रार्थना व मंत्रोच्चाराने मंदिरात स्थापित केल्या जाणार्‍या मूर्तींना देवत्व प्राप्त होते आणि सहभागी भक्तांनाही मानसिक शांती, समृद्धी यांसह कौटुंबिक सौहार्द मिळते. बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाच्या स्मरणार्थ आयोजित विश्वशांती महायज्ञ कार्यक्रमात प्रकट ब्रम्हस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी उपस्थितांना आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या. 

समारंभाचे अध्यक्षस्थान पूज्य भक्तीप्रियदास स्वामी, पूज्य विवेकसागरदास स्वामी, पूज्य त्यागवल्लभदास स्वामी, पूज्य घनश्यामचरणदास स्वामी, पूज्य महाव्रत दास, पूज्य श्रृतीप्रकाश दास, ईश्वरचरण दास, यांनी भूषविले तर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व त्यांच्या पत्नी भारती गमे यांनी देखील विश्वशांती महायज्ञात सहभाग नोंदवला. 

विश्वशांती महायज्ञात शेकडो भाविकांची हजेरी -
- बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर आयोजित विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात नाशिक, पुणे, धुळे, जळगाव ,औरंगाबाद अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हरिभक्तांसह गुजरात मुबई, पुणे, खानदेश आदी भागातील शेकडो भाविक सहभागी. 
- स्वामीनारायण मंदिरांच्या माध्यमातून संस्कृती, नात्यांतील गोडवा यांसह ह्रूणामुबंध जोसण्याचे कार्य.
- महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वामीनारायण मंदिराचे निर्माण व्हावे हा बीएपीएसचा संकल्प.

उद्या मंगळवार (दि. २७) विश्वशांती महायज्ञ व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून बुधवारी (दि. २८) महोत्सवातील मुख्य वेदोक्त मूर्ती प्रतिष्ठाविधी सोहळा.

 

Web Title: BAPS Vishwashanti Mahayagya for the welfare of the world; Idols attain divinity through prayer and chanting says Mahant Swami Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.