खडक सुकेणेच्या सरपंचपदी बापू गुबांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 01:06 AM2021-02-16T01:06:18+5:302021-02-16T01:06:48+5:30
दिंडोरी : तालुक्यातील खडकसुकेणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापू गुंबाडे यांची तर उप सरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांची बिनविरोध निवड ...
दिंडोरी : तालुक्यातील खडकसुकेणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापू गुंबाडे यांची तर उपसरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांची बिनविरोध निवड झाली.
खडकसुकेणा ग्रामपंचायतीची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. त्यात परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळविला होता. नुकतीच सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र गांगुर्डे यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी रवींद्र कुलकर्णी, ग्रामसेवक पवन शिरकांडे यांनी काम पाहिले. सरपंचपद निवडीसाठी बापू रामदास गुंबाडे यांचा तर उपसरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांचा प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. सदस्य मधुकर फुगट, मुक्ता गणोरे, सुरेखा पालखेडे, विजय गांगुर्डे, रंजना गुंबाडे, सुनीता वाघ, बाळू गवळी आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरीनाथ ढोकरे, नारायण गणोरे, अमोल गणोरे, विठ्ठल जाधव, रामनाथ जाधव, बापू गणोरे, प्रमोद फुगट, ज्ञानेश्वर गणोरे, विलास कळमकर, दत्तू कळमकर, नारायण आवारे, सुभाष गणोरे, शंकर गणोरे, माधव आवारे, अनिल जाधव ,सागर गांगुर्डे, जनार्दन पालखेडे, नारायण पालखेडे, विष्णू ढोकरे, लहानू भवर, किरण गवळी, प्रवीण गुंबाडे, सागर पालखेडे, विजय वाघ, वसंत फुगट, हिरामण गणोरे, विजय फुगट, बबन जाधव , संजय आवारे, प्रकाश कतोरे, केशव ढोकरे, जगण भगरे, निवृत्ती बदादे, गोटीराम आवारे, योगेश पालखेडे, आत्माराम गणोरे आदी उपस्थित होते.