महामार्गालगतचे ढाबे बनले बार

By admin | Published: April 14, 2017 12:44 AM2017-04-14T00:44:20+5:302017-04-14T00:44:46+5:30

पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्य पिण्यास, विकण्यास बंदीचा परिणाम

The bar of the highway became a bar | महामार्गालगतचे ढाबे बनले बार

महामार्गालगतचे ढाबे बनले बार

Next

नरेंद्र दंडगव्हाळ  : सिडको
एकीकडे शासनाने महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास व मद्य पिण्यास बंदी घातली आहे. तसेच मद्यविक्रीच्या दुकानांनादेखील बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र महामार्गालगतच असलेल्या बहुतांशी ढाब्यांवर विनापरवाना मद्य पिण्याची मुभा असल्याने हॉटेलमधील गर्दी कमी झाली असली तरी ढाबे मात्र फुल्ल असल्याने ढाबेच बार बनल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
शासनाने महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावरील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास व मद्य पिण्यास बंदी घातली असल्याने महामार्गालगतची शेकडो हॉटेल्स बंद अवस्थेत दिसत आहे. यात महामार्गालगतच्या अनेक हॉटेलमध्ये जेवणाव्यतिरिक्त मद्यपी हे केवळ मद्य पिण्यासाठीच जात असल्याने आज बहुतांशी हॉटेल्स बंद अवस्थेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. महामार्गालगतच्या हॉटेलबरोबरच मद्यविक्रीची दुकानेही बंद करण्यात आल्याने याचा फायदा मात्र पाचशे मीटरपेक्षा दूरवर असलेल्या हॉटेलचालकांना झाला आहे. यात काही हॉटेल्समध्ये गर्दी होत नव्हती असे हॉटेलदेखील फुल्ल होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील दत्तनगर भागात नागरी वस्तीत असलेले एक बिअर शॉपी असलेले दुकान परिसरातील महिलांनी बंद पाडले. अजूनही अंबडमधील काही भागांत विनापरवाना मद्यविक्री सुरू असल्याचे यावेळी नागरिकांनी पोलिसांना सांगितले.
एकीकडे महामार्गालगत मद्यविक्री तसेच पिण्यास बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र महामार्गालतच असलेल्या ढाब्यांवर मात्र मद्य पिण्यास परवानगी असल्याने ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ढाब्यांना केवळ जेवणासाठी परवानगी असून, याठिकाणी कोणीही विनापरवाना मद्यविक्री तसेच मद्य पिण्यास
मनाई असताना मात्र सर्व नियम
मोडत या ंिंठकाणी व्यवसाय केला जात आहे. महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये मद्य पिण्यास परवानगी नसल्याने ढाब्यांवर गर्दी होत आहे. तसेच मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या छोटेखानी टपऱ्यांवरदेखील रात्रीच्या सुमारास मद्यपे्रमींची गर्दी होते. याबरोबरच महामार्गालगत असणारे पेट्रोलपंप व गॅरेज याठिकाणी सर्रासपणे ट्रकचालक मद्य पित असल्याचे चित्र बघावयास मिळते.

Web Title: The bar of the highway became a bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.