सामनगावला धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:50 AM2019-05-18T00:50:59+5:302019-05-18T00:51:14+5:30
येथील सामनगाव शिवारातील वृद्धाश्रमाजवळ मळेवस्तीत सामनगाव-चाडेगाव रस्त्यालगत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सुदैवाने या घरातील कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही.
एकलहरे : येथील सामनगाव शिवारातील वृद्धाश्रमाजवळ मळेवस्तीत सामनगाव-चाडेगाव रस्त्यालगत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सुदैवाने या घरातील कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही.
सामनगाव येथील रहिवासी संतू ढोकणे यांच्या मळ्यातील घरात सदर प्रकार घडला. रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवणखाण आटोपून त्यांचा मुलगा व सून घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले, तर ढोकणे नातवासह घराच्या बाहेरील मोकळ्या जागेत झोपले. नात स्नेहल ही एकटीच घरात झोपी गेली होती. दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने स्वयंपाकघराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत स्नेहल झोपली होती त्याच खोलीत कपाट असल्याने दरोडेखोरांनी तेथे प्रवेश करून कपाट उघडले. त्यातील चीजवस्तू काढून घेऊन चोरटे दुसऱ्या रुममध्ये आले. दरोडेखोरांनी कोठी उघडून पाहिली असता त्यातही काही चीजवस्तू असल्याने ती कोठी उचलून बाहेर आणली. घराच्या व्हरांड्यातच त्यांनी ड्राव्हरमधील साहित्य इतस्त फेकून मौल्यवान साहित्य चोरले.