‘परीक्षा’ येता जवळी ; चेहरे लागले बोलू....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:31 AM2019-10-19T00:31:34+5:302019-10-19T00:32:00+5:30
मालेगाव : पाच वर्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मतदारांची ‘विकास’कामे करायची, त्यांच्या समस्या सोडवायच्या, कार्यकर्ते सांभाळायचे अन् पाच वर्षांनंतर निवडणूक लागली की, ‘परीक्षे’चा अर्ज भरायचा. परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाची आधीच धास्ती घेतली असून, कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागले आहेत.
शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पाच वर्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मतदारांची ‘विकास’कामे करायची, त्यांच्या समस्या सोडवायच्या, कार्यकर्ते सांभाळायचे अन् पाच वर्षांनंतर निवडणूक लागली की, ‘परीक्षे’चा अर्ज भरायचा. परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाची आधीच धास्ती घेतली असून, कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागले आहेत.
परीक्षा आता दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, निकालही त्यानंतर तात्काळ दोनच दिवसात जाहीर होणार असल्याने दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. आपल्याला जास्तीत जास्त ‘मार्क्स’ कसे मिळतील यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते दिवसाची ‘रात्र’ करीत असून, प्रचार सभांमधून अंधारात अभ्यासाच्या फैरी झडू लागल्या आहेत. बालगोपाळही मतदानाचा अधिकार नसताना खांद्यावर विविध रंगाचे झेंडे घेत बेरंग होत असून, वर्षभर अडगळीत पडणाºया तोफा आता गल्लीबोळांमधील व्यासपीठांवरून धडाडू लागल्या आहेत. काही तोफा कधी या गटात, तर कधी त्या गटात दिसत असल्याने त्यांना मिळणाºया दारूगोळ्याचीदेखील चर्चा गल्लोगल्ली रंगत आहेत.
अभ्यास करून मिळविलेल्या ‘मार्कां’च्या बळावर की ‘कॉपी’बहाद्दर समर्थकांच्या बळावर दोन्ही मतदारसंघातील कोणते उमेदवार ‘पास’ होतात की ‘बोर्डात’ चमकतात याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.मालेगावच्या गल्लीबोळातील सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक एक दुसºयाला कोणत्या बाजूची ‘हवा’ आहे याची विचारणा करीत असले तरी निवडणुकीच्या या वावटळात कुणाचा तंबू शाबूत राहतो आणि कुणाचा उडून जातो याकडे शहराचे लक्ष लागून आहे.परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून परीक्षकांनाही खास प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना परीक्षा काळात परीक्षार्थींच्या पेपरवर सुपरवायझरसारखे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. फरक इतकाच की शाळेतील खरी परीक्षा तीन तासांची आणि निवडणुकीतील परीक्षा दिवसभरातली. आता परीक्षार्थी व्यासपीठावर नको ते प्रश्न उपस्थित करीत असून, त्यांची उत्तरे इतर सभांमधून ऐकू येत आहेत.बोलके चेहरे : मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोन
परीक्षा केंद्रांवर होणाºया परीक्षेत उमेदवारांना प्रचाररूपी कॉपी पुरविणाºया कार्यकर्त्यांच्या चेहºयावर भयग्रस्त निकाल उमटू लागला असून,
कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागल्याने सर्वसामान्य मतदारांना आपसूचक निकाल हाती मिळत आहे. काहींना आपल्याच ‘ताकदी’वर परीक्षा द्यावी लागत असताना काही उमेदवारांना मात्र बाहेरून ताकद मागवावी लागत आहे. उमेदवारांची खरी परीक्षा तर कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून असून, उमेदवारांसाठी त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे राहून इतरांशी पंगा घेताना दिसत आहेत.