दीड महिन्यांपासून बॅरिकेड्स पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:14 AM2019-06-13T00:14:48+5:302019-06-13T00:15:59+5:30
पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलीस यंत्रणेला त्यांनी सभास्थळी टाकलेले बॅरिकेड्स उचलून नेता आलेले नाही. त्यामुळे सदर बॅरिकेड्स अस्ताव्यस्त पडले असून, काही चोरीलाही गेल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहीर सभा झाली होती. या सभेची सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सदर विशाल जागेत सापांचा वावर असल्याने पोलीस प्रशासनाने सर्पमित्रांची फौज तैनात केली होती. शिवाय पंतप्रधानांची सभा म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाय योजले होते. मोदींच्या सभेआधीच पाच दिवस शेकडो लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले होते. सदर बॅरिकेड्स जिल्हा भरातून आणण्यात आले होते. मात्र आता सभा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी सभास्थळी सदर बॅरिकेड्स बेवारस स्थितीत पडून असून, पोलीस यंत्रणेला ते अद्याप उचलून नेण्यात वेळ मिळालेला नाही.
त्यामुळे बरेच बॅरिकेड्स रस्त्यावर येऊन पडल्याने अपघातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही बॅरिकेड्स चोरीला गेले असल्याचीही चर्चा आहे. अपघातात एकाचा बळीपोलिसांनी सभास्थळी लावलेल्या याच बॅरिकेड्समुळे पंधरा दिवसांपूर्वी प्रकाश दिवरे या व्यक्तीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. तरीही पोलीस प्रशासनाने अजूनही बॅरिकेड्सबाबतीत दखल न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.