बॅरिकेड्सचे अंतर कमी केल्याने झाली वाहतूक सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:02 AM2018-01-10T01:02:15+5:302018-01-10T01:08:51+5:30
इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याचे आदेश देऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होण्यास चांगलीच मदत झाली आहे़

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या बोगद्यात असलेल्या बॅरिकेडिंगमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असे़ सहायक पोलीस आयुक्त देवरे यांनी मंगळवारी दुपारी होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केल्यानंतर त्वरित बोगद्यातील बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याच्या सूचना केल्या़ तसेच बोगद्यातून निघणाºया वाहनधारकाला शहरात जाण्यासाठीचा मार्ग सुरळीत करण्याच्या सूचना केल्या़ यामुळे इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे़
यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, पूर्व प्रभाग सभापती शाहिन मिर्झा, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक एम़ बी़ काळे, इथापे, वसंत चिकोडे, पारख यांसह नागरिक उपस्थित होते.एकेरी वाहतूक सुरु
४ सुमारे दोन वर्षांपूर्वी इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली़ तसेच गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येण्यास बंदी करण्यात आली आहे़
बॅरिकेड्सचे अंतर कमी करताना पोलीस.इंदिरानगर बोगदा : पुन्हा एकदा पोलिसांकडून प्रयोग; वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्नबॅरिकेड्सचे अंतर कमी केल्याने झाली वाहतूक सुरळीत!इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याचे आदेश देऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होण्यास चांगलीच मदत झाली आहे़