लॉकडाउन काळात वक्र ांगी केंद्राचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:03 PM2020-04-02T17:03:45+5:302020-04-02T17:04:04+5:30
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सतर्क झाले आहेत. संचारबंदी असल्याने अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र, अनेकांना वक्र ांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात येत असल्याने आर्थिक कोंडी सुटल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
पिंपळगाव बसवंत : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सतर्क झाले आहेत. संचारबंदी असल्याने अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र, अनेकांना वक्र ांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात येत असल्याने आर्थिक कोंडी सुटल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
या केंद्रावर ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागताच देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद असून, यामुळे काही ठिकाणी अडचणी येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान जीवनावाश्यक व अत्यंत गरजेच्या सेवा सुरू आहेत. या सेवा देताना त्यांना काटेकोरपणे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.नाशिक जिल्ह्यातील वक्र ांगी केंद्राद्वारे जिल्ह्यात बँकिंग सुविधा दिली जाते. विशेषत: ग्रामीण भागात या सेवेचा सर्वात मोठा फायदा भेटताना दिसत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून युनियन बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया या बँकेतील ग्राहकांना सुविधा पुरवल्या जातात. पैसे ट्रान्सफर करणे, मोबाइल डिश रिचार्ज अत्यावश्यक औषधे जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वक्र ांगी केंद्राच्या माध्यमातून शरीराच्या ८२ प्रकारच्या रक्ततपासणीदेखील केली जाते. महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधांचा कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील वृद्ध, निराधार, महिला यांना या सर्व सेवेचा मोठ्या प्रामाणात फायदा होत आहे.
लॉकडाउनच्या काळात या केंद्रांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील ७० केंद्र व ४५ एटीएमच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ५० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देण्यात आली. बँकेला वेळेचे बंधन असल्याने ग्राहकांना येण्या-जाण्याच्या अडचणी तसेच गर्दी टाळणे यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे. जिल्ौंतील 70 केंद्रांना विभागीय व्यवस्थापक निखिल शहा व जिल्हा व्यवस्थापक शिवाजी पवार व निफाड येथील वक्रांगी केंद्राचे तालुका व्यवस्थापक विष्णू ढोमसे यांची ग्राहकांना मदत होत आहे.