भोजापूर धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:30 PM2018-05-21T14:30:41+5:302018-05-21T14:30:41+5:30

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत.

The base reached by Bhojapur dam | भोजापूर धरणाने गाठला तळ

भोजापूर धरणाने गाठला तळ

googlenewsNext

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत. पाच धरणांपैकी भोजापूर धरण सर्वात मोठे धरण आहे. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावे धरणाच्या लाभक्षेत्रात असून भोजापूर धरणावरच परिसरातील पाणी पुरवठा योजना व शेती व्यवसाय अवलंबून आहे. म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण बांधण्यात आले असून ३६१ दशलक्ष घनफूट क्षमता असुन १०७ दशलक्ष घनफूट निरूपयोगी साठा आहे. गत महिन्यापासून तीव्र उन्हामुळे धरणातील पिण्याचे वेगाने बाष्पीभवन तसेच धरणातून राजरोसपणे होणारा अवैध पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा मागील वर्षी पेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मे मिहन्याच्या अखेरीस धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.भोजापूर धरण गतवर्षी पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. पूरपाण्याचा लाभक्षेत्रातील गावांना फायदा झाला होता. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील सुमारे २१ गावातील १०० च्या आसपास लहान मोठे केटीवेअर बंधारे भरण्यात आले होते. तब्बल अडीच मिहने पूरपाणी कालव्याद्वारे सुरु होते. पुर्व भागातील पांगरी परिसरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे अनेक वर्षानतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरणाच्या पाण्यावर कणकोरी सह पाचगावे व मनेगाव सह सोळागावे नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. आजमतिीला धरणातील उपयुक्त पाण्यासाठ्या पैकी फक्त दोन दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहेत. धरणातील मृत पाणी साठ्यावर आगामी काळात पाणी पुरवठा योजना तग धरून राहतील अशी परिस्थिती आहे. धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो. त्यामुळे पाणी बेचव लागते.भविष्य काळात पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भोजापूर धरणात उपयुक्त पाणी साठा संपत आला असुन मृतपाणी साठ्यावर नळपाणी योजना सुरू राहतील व सुमारे दोन महिने पाणी पुरवठा सुरू राहू शकतो.
------------------
गाळाची समस्या बनली गंभीर
भोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून आहे.भोजापूर धरण उभारणीपासून आजपर्यंत गाळ उपसण्यात आला नाही तसेच धरणाच्या अनेक भागात टेकड्या असल्याने पाण्याची जागा गाळाने व्यापली आहे. त्याचा परिणाम पाणी पातळीवर झाला आहे.गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील पाणी नदी द्वारे वाहून जाते.धरणातील गाळ काढल्यास पाण्याची पातळी वाढेल आण ित्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना होईल.
 

Web Title: The base reached by Bhojapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक