गोदावरी नदीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:01 PM2019-04-27T20:01:08+5:302019-04-27T20:10:44+5:30

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.

The base reached by Godavari river | गोदावरी नदीने गाठला तळ

गोदावरी नदीने गाठला तळ

Next
ठळक मुद्देचांदोरी : ग्रामस्थांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.
कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता गोदाकाठी असलेल्या गावांना बसत आहे. चांदोरी पासून पूढे ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा चांदोरी येथील गोदापात्रात असतो परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरवाती पासूनच गोदावरी नदीची पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली होती. एप्रिलच्या अखेर गोदावरीने तळ गाठला. यामुळे गोदाकाठच्या गावांना तसेच आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. चांदोरी व इतर गावातील शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्चकरून शेतीसाठी नदीवरु न पाईपलाइन केली आहे. नदीपात्रात मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चांदोरी येथे गोदावरी नदीवर घाट असल्याने दशक्रि या विधीचे कार्यक्र म येथे होत असतात परंतु पाण्याचा अभावामुळे अंघोळी करीता ग्रामपालिकेच्या टँकर मार्फत पाणी पुरवठा होत आहे. चांदोरीच्या पश्चिम व उत्तर भागात शेत, मळ्यातील विहिरींनी व बोअरवेलने सुद्धा तळ गाठला आहे. या मुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सद्यस्थितीला नदी पात्रात असलेल्या ग्रामपालिकेच्या विहिरी मधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा अवघे काही दिवस टिकेल इतका आहे. यामुळे आता स्थानिक नागरिक व शेतकरी धरणाच्या पाण्याचा आवर्तनाची मागणी करू लागले आहे.
राज्यभर दुष्काळस्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ व इतर परिसरातील गावांनी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापरावे.
- शिरीष गडाख,
उपसरपंच, ग्रामपालिका चांदोरी.
 

Web Title: The base reached by Godavari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.