‘यू-ट्युब’च्या आधारे एटीएमवर डल्ला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:36 AM2019-02-10T01:36:02+5:302019-02-10T01:37:13+5:30
काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस कटर), फायटर आणि मोटरसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सातपूर : काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस कटर), फायटर आणि मोटरसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बॅँकेचे एटीएम यू-ट्युबच्या आधारे माहिती घेऊन फोडण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूर पिटर मोबाइलवरील सहायक पोलीस निरीक्षक संदीप वºहाडे हे पेट्रोलिंग करीत असताना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळील अंधारात तीन जण तोंडाला रुमाल बांधलेले संशयास्पद हालचाल करीत असताना दिसले. पोलीस वाहन थांबवून त्यांना हटकले असता दोघेजण पळून जाऊ लागले. संशय आल्याने वºहाडे यांनी त्वरित डीबी मोबाइलवरील पोलीस कर्मचारी मनोहर सूर्यवंशी, डी. के. पवार, गोकुळ कासार, जावेद शेख, राजेंद्र घुमरे, सागर कुलकर्णी, तेजस मते, विनायक आव्हाड यांना बोलावून घेतले व पळून जाणाºया संशयितांचा पाठलाग करून पकडले. विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडील मोबाइल ताब्यात घेऊन हिस्टरी तपासली असता यू- ट्यूबमध्ये ‘ताला तोडनेकी जाणकारी’ ‘चोरी करण्याच्या पद्धती’ असे व्हिडिओ पाहिल्याचे आढळून आले. सचिन रामभाऊ विश्वकर्मा (१९) रा. रामवाडी, पंचवटी, सचिन बाबूराव वड (२६) रा. रामवाडी आणि एक अल्पवयीन बालक अशी संशयितांची नावे असून, त्यांची अंग झडती घेतली असता पाठीवरील सॅकमधून तीन किलो वजनाचे गॅसटाकी (सिलिंडर), रेग्युलेटर, नोझल, नळी, गॅसगन, फायटर, यामाहा कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच १५ जीएस १८८९) असा ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तिघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.