तळघर बनले डासांचे आगर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:21 PM2020-08-10T23:21:38+5:302020-08-11T01:24:57+5:30
नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांत डेंग्यूमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्यावर्षी शहरात तीन हजारांहून अधिक संशयित डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यापैकी एक हजार नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळले होते. यंदा कोरोनामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे नागरिकांचेदेखील पावसाळ्यात आरोग्य विषयक दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या अनेक भागांत व्यापारी संकुले व अन्य रहिवासी इमारतींच्या तळघरात पाणी साचत असून, त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होत आहे. पावसाळ्यात इमारतीच्या छतावर, तळघरात किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होते. महापालिकेच्या सर्वेक्षणात असे अनेकदा आढळलं आहे. त्यानुसार संबंधित भागात डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने इमारतमालकांना अथवा विकासकांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्यापलीकडे कोणतीही कारवाई होत नसल्याने दरवर्षीच असा प्रश्न निर्माण होत असतो. सध्या कोरोनाचे संकट असताना आता पावसाळ्यामुळे या आजारांनी डोके वर काढले आहे.
जुलै महिन्यात शहरात ३२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने वेळीच उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.अनास्था : कचऱ्यांच्या ढिगांकडे सोयीस्कर डोळेझाकमहात्मा गांधीरोडवरील व्यापारी संकुले म्हणजेच स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे नेहमीप्रमाणे तळघरात पाणी साचले असून, डासांची निर्मिती होत आहे, मात्र याकडे महापालिका आणि संबंधित व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. महानगरातील अनेक निवासी संकुले, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ग्राऊंड फ्लोअर आणि तळघरांमध्ये घाण आणि कचºयाचा प्रश्न वाढलेला आहे. त्याचा त्रास प्रामुख्याने आसपासच्या रहिवाशांना होत असून त्यांना कुणीच वाली नाही, अशी अवस्था आहे. केवळ याच नव्हे तर शहरातील अन्य भागांतदेखील डासनिर्मितीची अनेक ठिकाणे आणि ब्लॅकस्पॉट असून, त्याकडे लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.