जागा मालकच देणार मूलभूत सुविधा
By admin | Published: April 12, 2017 11:23 PM2017-04-12T23:23:55+5:302017-04-12T23:24:16+5:30
जायखेडकर : विकास आराखड्याची दिली माहिती
नाशिक : महापालिकेच्या नव्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार आता जागा मालकच अभिन्यास करताना रस्ते, पाणी आदि सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यामुळे नागरिकांना आता हक्काच्या चांगल्या सुविधा मिळणे शक्य आहे, असे मत वास्तुविशारद विवेक जायखेडकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने विकास आराखड्यासंदर्भातील गैरसमजांविषयी जायखेडकर यांचे व्याख्यान गंजमाळ येथील सभागृहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी सुनील सुकेणकर होते. शहराचा विकास आराखडा म्हणजे काय, तो कसा तयार केला जातो या माहितीसह त्यांनी नव्या भागश: मंजूर झालेला आराखडा आणि बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील अनेक बारकावे सांगितले. जायखेडकर यांनी सांगितले की, आराखड्यामुळे अॅमेनिटीजसाठी जागा महापालिकेला द्यावी लागेल, गरिबांच्या घरासाठी असलेले भूखंड महापालिकेला मिळेल तसेच आरक्षणे देताना त्याचा मुबलक टीडीआर मिळणार आहे. अनिल सुकेणकर यांनी स्वागत केले. जायखेडकर यांचा परिचय अजय राका यांनी करू दिला. तर राधेय येवले यांनी आभार मानले.