‘सामूहिक विवाह’ समाजाच्या प्रगतीचा आधार
By admin | Published: December 27, 2015 10:55 PM2015-12-27T22:55:56+5:302015-12-27T23:05:15+5:30
मोईनुद्दीन अशरफी : अकरा मुस्लीम जोडप्यांचा थाटामाटात ‘निकाह’
नाशिक : मुला-मुलींचा विवाह हा पालकांचा सर्वाधिक चिंतेचा विषय बनत चालला असून, वाढत्या महागाईबरोबरच विवाहसमारंभात होणारा चंगळवादावरील खर्च बघून गोरगरीब कुटुंब धसका घेत आहे. त्यामुळे ‘सामूहिक विवाह’चे उपक्रम काळाची गरज असून, समाजाच्या प्रगतीसाठी उत्तम आधार आहे, असे प्रतिपादन मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना हजरत सय्यद मोईनुद्दीन अशरफी यांनी केले.
युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल गु्रपच्या वतीने जुने नाशिकमधील कथडा परिसरात आयोजित सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशरफी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सामूहिक विवाह ही संकल्पना अत्यंत गरजेची व समाजभिमुख आहे. युवकवर्गाने यासाठी मागील तीन वर्षांपासून घेतलेला पुढाकारदेखील कौतुकास्पद आहे.
शहरात वर्षभरातून दोन संस्थांमार्फ त उपक्रम राबविला जातो हे या शहराचे मुख्य वैशिष्ट. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मीर मुख्तार अशरफी, बबन घोलप, हज समितीचे राज्याचे अध्यक्ष इब्राहीम शेख, हाजी अरफात, नगरसेवक गुलजार कोकणी, सलीम शेख, संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख आदि मान्यवर उपस्थित
होते. (प्रतिनिधी)