शिष्यवृत्तीचा आधार अन् इलेक्ट्रिकल व्हेइकलचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:58+5:302021-08-01T04:13:58+5:30

नाशिक : भारतात दुचाकी वाहनांचा वापर केवळ प्रवासासाठी केला जात नाही, तर हातावर पोट असलेले अनेक जण व्यवसायासाठीही दुचाकी ...

The basis of the scholarship is the invention of the electrical vehicle | शिष्यवृत्तीचा आधार अन् इलेक्ट्रिकल व्हेइकलचा आविष्कार

शिष्यवृत्तीचा आधार अन् इलेक्ट्रिकल व्हेइकलचा आविष्कार

Next

नाशिक : भारतात दुचाकी वाहनांचा वापर केवळ प्रवासासाठी केला जात नाही, तर हातावर पोट असलेले अनेक जण व्यवसायासाठीही दुचाकी वापरतात. घरोघरी दूध, वृत्तपत्रे पोओचविणे, पोहे-उपमा-इडलीचे फिरते स्टॉल अन् चहा विक्री अशा प्रकारचे असंख्य व्यवसाय दुचाकीवरून केले जातात. त्यासाठी जुगाड करून ‘दुचाकी’ला व्यवसायासाठी तयार करतात. त्यासाठी म्हणजे वेल्डिंग, मॉडिफिकेशन केल्यामुळे गाडीची व्यवस्थित बांधणी न झाल्यामुळे अशा वाहनांची अपघात होण्याची शक्यताही वाढते. मुळात ‘दुचाकी’ ही या व्यवसायांसाठी नसते; पण पोट भरण्यासाठी दुचाकीचा व्यवसाय म्हणून वापर करणे, हातावर पोट असलेल्या लोकांना आवश्यक आहे. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन या ‘स्टार्टअप’मध्ये लोकांना व्यवसाय करण्यास सुलभ होईल. असे सात प्रकारचे ‘मॉड्यूलर’ सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेतलेल्या पुष्कराज साळुंके व प्रीतेश महाजन या विद्यार्थ्यांनी उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांनी जयेश टोपे या सहकाऱ्यास सोबत घेऊन बनविलेल्या ‘रिव्हॅम्प मोटो’ या नाशिकस्थित ‘स्टार्टअप’ ने लक्षवेधी यश मिळवत देशातील पहिल्या वीस ‘मॉड्यूलर हेवी-ड्यूटी इलेक्ट्रिकल व्हेइकल स्टार्टअप’मध्ये आपले स्थान पटकावले आहे.

‘मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती’तून घेतले शिक्षण

अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनी अल्टैर इंडिया, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, भारतीय उद्योग महासंघ आणि आयआयटी मद्रास यांच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावरील ‘अल्टैर स्टार्टअप चॅलेंज’ या स्पर्धेत या तिन्ही विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप’ने पहिल्या २० मध्ये स्थान पटकावले आहे. पुष्कराज साळुंखे याने एनडीएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व प्रीतेश महाजन याने सपकाळ नॉलेज हब येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण सामाजिक न्याय विभागाच्या ‘ मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती’मधून पूर्ण केले आहे. ‘अल्टैर स्टार्टअप चॅलेंज’ स्पर्धेत देशभरातून दीडशेहून अधिक ‘स्टार्टअप’ने सहभाग नोंदविला होता.

इंधनबचतही शक्य

या ‘मॉड्यूलर’चा वापर करून आपण सहजपणे कुठेही व्यवसाय करू शकतो. विशेष म्हणजे या मॉड्यूलसोबत ‘स्मार्ट व्हेइकल ऐज ॲसेट (एसव्हीए) संकल्पना वापरत ‘स्टार्टअप’मधील ‘मॉड्यूलर’साठी साहाय्य ठरेल अशा ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल’ची निर्मितीही केली आहे. यामुळे प्रदूषणाला अटकाव व इंधनबचतही सहजशक्य होणार असल्याचा विश्वास पुष्कराज साळुंके व प्रीतेश महाजन या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The basis of the scholarship is the invention of the electrical vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.