कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:50+5:302021-04-11T04:14:50+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ...

This battle against Corona will not end | कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही

कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले, त्यावेळी भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असून आपण उपाय योजना करत असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खासगी डॉक्टर, नर्स, परिचारिका यांनी कामासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या काळात आवश्यकता लक्षात घेऊन पुन्हा एकदा नाशिककरांसाठी क्रेडाईने कोविड केअर सेंटरची केलेली निर्मिती ही कौतुकास्पद बाब आहे. मनपा आणि शासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात करण्यात येत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार व निर्बंधांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना समाजातील इतर संस्थांनीदेखील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले. यावेळी जीतूभाई ठक्कर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा गटनेते सतीश सोनवणे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, मनोज खिवसरा, रंजन भलोडिया, राजेश आहेर, हंसराज देशमुख, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

(फोटो १० भुजबळ) ठक्कर डोम येथील कोविड सेंटरची पाहणी करताना छगन भुजबळ

Web Title: This battle against Corona will not end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.