आधी लढाई जीवन-मरणाची; मग हक्क आणि अधिकारांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 01:50 AM2021-05-20T01:50:32+5:302021-05-20T01:50:57+5:30
आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच.
नाशिक : आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच.
तथापि, आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. आपण प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे. जीवन- मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे. माणसे जगली तर मिळालेले आरक्षण सार्थ ठरेल. ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेन, अशी प्रतिक्रिया छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी छत्रपती संभाजीराजे यांनी गायकर, तेलंग, थाेरात, गायके, घाटे कुटुुंबीयांवर काेरोनामुळे आघात झाल्याने या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते शिवतीर्थ प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. यावेळी विलास पांगरकर, प्रमोद जाधव, तुषार जगताप, नगरसेवक योगेश शेवरे, विक्रम नागरे, बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रीतेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, नीलेश शेजूळ, सोनू काळे, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते.