बावा खून प्रकरणात संशयिताला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:58 PM2020-02-28T23:58:47+5:302020-02-28T23:59:54+5:30
वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंचवटी : वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पेठरोड इंद्रप्रस्थनगरी येथे गेल्या बुधवारी सुनील बावा याने त्याची पत्नी चैताली बावा हिचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर सुनीलने स्वत:च्या हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार संशयित आरोपीने त्याच्या कल्याण येथील चुलत भावाला फोन करून सांगितल्यानंतर त्याच्या चुलत भावाने मयत विवाहितेच्या वडिलांना माहिती दिली.
त्यानुसार प्रकाश बावा यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयितालाही औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी (दि.२८) दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.