बीसीसीआय नियमांमुळे रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:44 AM2018-12-13T00:44:15+5:302018-12-13T00:45:07+5:30
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे.
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. या रणजी सामन्यात भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधव असल्याने बीसीसीआयचे विशेष लक्ष असणार आहे. खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे यंदा खेळाडूंभोवती बीसीसीआयचे कडे करण्यात आले आहे. खेळाडूंचे पॅव्हेलियन आणि खेळाडूंवर बारकाईने वैयक्तिक लक्ष ठेवले जात आहे. यासाठी बीसीसीआय लाचलुचपत विभागाचे निरीक्षक सामन्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
खेळाडूंना कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याची परवानगी नसून कोणाबरोबर संवाददेखील ते साधू शकत नाहीत. यासाठी अगोदर त्यांच्या मॅनेजरची परवानी घ्यावी लागू शकते. सदर आचारसंहिता स्टार खेळाडूंबाबत असून, रणजीतील इतर खेळाडूंना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे. पॅव्हेलियन परिसर निषिद्ध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही संघाच्या पॅव्हेलियनच्या पॅसेजमध्ये आॅफिशिअल्स वगळता त्रयस्त कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. लॉबी समोरू
न जाण्या-येण्यासही मज्जाव करण्यात आलेला आहे. त्याचे काटेकोर पालनही केले जाणार असून, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था लॉबीपासून दूर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भारताकडून खेळणारे केदार जाधव आणि सौराष्टÑकडून जयदीप उनाडकट हे खेळत असल्याने सुरक्षा यंत्रणेला चांगलीच धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सामन्याची काटेकोर तयारी केली आहे.
खेळाडूंना मोबाइल ‘नॉट अलाउड’
बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे दोन्ही संघांच्या खेळाडूंना मोबाइल वापरण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे त्यांना सामन्याच्या दरम्यान आपले मोबाइल संघ व्यवस्थापकाकडे जमा करावे लागणार आहेत. स्पर्धा सुरू असताना त्यांचा त्रयस्थांशी संपर्क येऊ नये म्हणून बीसीसीआयने काळजी घेतली आहे. खेळाडूंना कोणत्याही उद्घाटनासाठी किंवा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहता येणार नाही.