सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:13+5:302021-01-22T04:14:13+5:30

नाशिक : मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने महिला वर्गात रंगणाऱ्या हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमातून परस्पर स्नेहाचा गोडवाही वृद्धिंगत होतो. परंतु, यावर्षी मकरसंक्रांतीच्या ...

Be careful! Corona does not spread from Sankranti variety | सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना

सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना

Next

नाशिक : मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने महिला वर्गात रंगणाऱ्या हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमातून परस्पर स्नेहाचा गोडवाही वृद्धिंगत होतो. परंतु, यावर्षी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महिलांच्या हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमांवरही परिमाम झाला असून, मकरसंक्रांतीचे वाण कदाचित कोरोनाचे दान तर ठरणार नाही ना, अशी साशंकचा व्यक्त होताना दिसून येत आहे. मकरसंक्रांत झाल्याने आता महिला वर्ग हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींना वाण देण्यासाठी घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका तर वाढत नाही ना याता विचार करण्याची सध्या आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाची लस आल्याने सर्वसामान्य नागरिक घराबाहेर वावरताना फारशी काळजी घेताना दिसत नाही. कोरोनाची लस आली असली तरी अद्याप ही लस सर्वांसाठी उपलब्ध नाही, त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र संक्रांतीचे वाण देण्या-घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या बहुतांश महिलांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लस आली तरी धोका कायम

वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क विसरू नका. सोबत सॅनिटायझरही आवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना पसरतोय-

दिनांक - पॉझिटिव्ह - मृत्यू

१४ जानेवारी - १६२ - ०३

१५ जानेवारी - २१७ - ०४

१६ जानेवारी - १८५ - ०३

१७ जानेवारी - १२९ - ०१

१८ जानेवारी - १४४ - ०२

१९ जानेवारी - १६२ - ०१

२० जानेवारी - १९२ - ०३

२१ जानेवारी - १२४ - ०१

Web Title: Be careful! Corona does not spread from Sankranti variety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.