सावधान....! पाच रुपयांपासून दिलासा; मात्र पाचशेचा बसू शकतो भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 09:10 PM2021-03-31T21:10:05+5:302021-03-31T21:13:17+5:30

गुरुवारपासून (दि.१) बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी निशुल्क 'कुपन' देण्यात येईल. मात्र, खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा 'जैसे-थे' असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

Be careful ....! Relief from five rupees; But five hundred can fit | सावधान....! पाच रुपयांपासून दिलासा; मात्र पाचशेचा बसू शकतो भुर्दंड

सावधान....! पाच रुपयांपासून दिलासा; मात्र पाचशेचा बसू शकतो भुर्दंड

Next
ठळक मुद्देएन्ट्री पॉइंटवर मोफत टोकन पोलिसांकडून दिले जाईलबाजारातून परतणाऱ्या ग्राहकांचे टोकन तपासले जाईलएक तासापेक्षा जास्त वेळ थांबल्यास पाचशे रुपये दंड

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील तोबा गर्दी होणाऱ्या बाजारपेठांमध्ये पाच रुपये आकारणी करत सशुल्क प्रवेश देण्याचा प्रयोग पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मनपाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यास दोन दिवसांपुर्वी सुरुवात केली होती. यावेळी तिकिट काऊंटरवर पाच रुपयांसह पावतीच्या देवाणघेवाणमध्ये लागणारा वेळ यामुळे ह्यसोशल डिस्टन्सह्ण धोक्यात सापडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पाच रुपये आकारणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे पाण्डेय यांनी जाहीर केले.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे सुरक्षित वावर राखणे, सर्व ग्राहकांना तिकिट काऊंटरवर रोखणे शक्य होत नसल्याने तुर्तास सशुल्क प्रवेशाचे निर्बंध शिथिल करण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि.१) बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी निशुल्क 'कुपन' देण्यात येईल. मात्र, खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा 'जैसे-थे' असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही शिस्तीने पाच रुपयांची पावती घेत नाशिककरांनी बाजारपेठेत प्रवेश घेतला. पण, यावेळी बऱ्याच ह्यएन्ट्री पॉइंटह्णवर गर्दी झाली. पावती देण्यासाठी अपुरे मनुष्यबळ तसेच लागणारा वेळ यामुळे गर्दीत भर पडली. तसेच बाहेर पडणाऱ्या ग्राहकांची पावतीची तपासणी करणेही अवघड झाले. त्यामुळे अगोदर पूर्णत: मनुष्यबळ सज्ज करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पाण्डेय यांनी बुधवारी सायंकाळी मेनरोड व पवननगरच्या बाजारात पाहणी केली. यावेळी त्यांनी गुरुवारपासून सशुल्क प्रवेशाऐवजी मोफत कुपन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सशुल्क प्रवेश केवळ स्थगित केले आहेत. महापालिकेतर्फे ह्यॲपह्ण तयार झाले तसेच ई-स्वरुपात चलन फाडून प्रिंटेड तिकिट देण्याची यंत्रे उपलब्ध होताच पुन्हा पाच रुपये आकारणी सुरु केली जाणार असल्याचेही पाण्डेय यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
- -
हे निर्बंध कायम
- एन्ट्री पॉइंटवर मोफत टोकन पोलिसांकडून दिले जाईल
- बाजारातून परतणाऱ्या ग्राहकांचे टोकन तपासले जाईल
- सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल
- एक तासापेक्षा जास्त वेळ थांबल्यास पाचशे रुपये दंड देखील होऊ शकतो
- सुरक्षित वावर किंवा मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड
बाजारपेठेत थुंकताना किंवा धुम्रपान करताना आढळल्यास १ हजारांचा होईल दंड
बाजारपेठेत पोलिसांची असणार पायी गस्त

Web Title: Be careful ....! Relief from five rupees; But five hundred can fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.