ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळा होण्याआधीच खिसा रिकामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:44+5:302021-09-16T04:19:44+5:30
इन्फो.. ही काळजी घ्या.. - ऑनलाइन जोडीदार निवडताना त्याची पुरेशी आणि खात्रीशीर माहिती मिळवा. - केवळ संंबंधितांनी दिलेल्या माहितीवर ...
इन्फो..
ही काळजी घ्या..
- ऑनलाइन जोडीदार निवडताना त्याची पुरेशी आणि खात्रीशीर माहिती मिळवा.
- केवळ संंबंधितांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, स्वत: खात्री करावी.
- कोणी अविवाहित किंवा बड्या कंपनीत नोकरी करीत असल्याचे सांगत असेल तर लगेच भुलण्याऐवजी खात्री करून घ्या.
- नवीनच मैत्री झाल्यानंतर अचानक पैसे मागत असेल तर अधिक दक्ष राहा
इन्फो...
अशी होऊ शकते फसवणूक
१ आयुष्याचा जोडीदार निवडल्यानंतर काही तरी निमित्त करून पैसे मागण्याचे प्रकार घडत असून, मोठी रक्कम घेतली जाते. त्यामुळे नव्या ओळखीतच इतकी रक्कम कोण मागेल याची खात्री करावी.
२ चुकीचे प्रोफाईल पिक्चर ठेवून फोटो ठेवणे, अविवाहित असल्याचे सांगणे आणि बड्या कंपनीतील नाेकरी हे जाळे टाकण्याचे प्रकार असून, त्याबाबत खात्री केलेलीच बरी.
कोट..
जोडीदाराच्या प्रभावाखाली जाण्याआधी म्हणजेच भावनिक होण्याआधीच व्यवहार्य विचार करायला हवा. संबंधित मुलगा किंवा मुलीचे आधारकार्ड- पॅनकार्ड घेतले पाहिजे. त्या व्यक्तीचा फोटो गुगल इमेजेसमध्ये तपासल्यावर खरोखरीच तीचा किंवा त्याचा फाेटो खरच आहे का हे तपासावे तसेच क्रीमीनल रेकॉर्डसाठीदेखील साइटवर संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याची माहिती मिळते. ज्या बड्या कंपनीत आपण नोकरीला असल्याचा दावा संबंधित करीत आहेत, त्या कंपनीची लिंक तपासावी आणि गेल्या काही महिन्याच्या पे स्लीपदेखील तपासून घ्याव्यात.
- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ