‘मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:52 AM2019-01-22T01:52:22+5:302019-01-22T01:52:38+5:30

पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांनी केले आहे.

 Be careful while going to 'Morning Walk'! | ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान...!

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान...!

Next

नाशिक : पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांनी केले आहे.  मखमलाबाद शिवारातील जगझाप मळा, कोशिरे मळा, गोसावी मळा, मखमलाबाद-रामवाडी रस्त्याचा परिसर, डावा कालवा भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे खात्रीशिर पुरावे वनविभागाच्या गस्त पथकाला आढळून आले आहे. या भागात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे तैनात करण्यात आले आहे. काही भागात ट्रॅप कॅ मेरेदेखील लावण्याची तयारी वनविभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. बिबट्या नजरेस पडल्यास त्याला कुठल्याहीप्रकारे असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कृत्य नागरिकांनी टाळावे. तसेच गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला लोकांनी सहकार्य करत योग्य माहिती द्यावी, अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा
या भागात बिबट्याचा मुक्त संचार हा मोकाट कुत्र्यांच्या आकर्षणापोटीदेखील असू शकतो त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या भागात सातत्याने मोकाट कु त्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविणे गरजेचे आहे.
बिबट हा उपलब्ध अधिवासाशी जुळवून घेणारा वन्यप्राणी आहे. कुत्र्यांनादेखील तो खाद्य बनवितो. या भागातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.
डावा कालवा नैसर्गिक ‘कॉरिडोर’
महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. शहरापासून लांब व नैसर्गिक लपणचा परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो.

Web Title:  Be careful while going to 'Morning Walk'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.