मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:13+5:302021-02-15T04:14:13+5:30

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न पाहता प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीदेखील ...

Be prepared to fight municipal elections on your own | मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Next

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न पाहता प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीदेखील ठेवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना केले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, माजी आमदार अपूर्व हिरे, जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची विकासकामे पोहचविली पाहिजे. कोरोनाकाळात आपण नागरिकांसाठी चांगली कामे केली आहे. ती कामे यापुढील काळातही अविरत सुरू ठेवावी. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या आहेत याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता. वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न बघता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांनी कोविड-१९च्या काळात शहर व परिसरात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. नाशिकमध्ये यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

(फोटो:१४राष्ट्रवादी)

Web Title: Be prepared to fight municipal elections on your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.