पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

By Suyog.joshi | Published: September 14, 2023 04:01 PM2023-09-14T16:01:26+5:302023-09-14T16:02:19+5:30

15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.  

Be prepared for water cuts, Jalsampad has written a letter to the Municipal Corporation | पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

googlenewsNext

- सुयोग जोशी

नाशिक - यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणीसाठा अवघ्या चाळीस टक्याच्या आतच असल्याने भविष्यातील पाण्याची स्थिती पाहता जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी कपातीची तयारी ठेवण्याचे पत्र पाठवले आहे. 15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.  

नाशिक शहराची तहान भागविणारे गंगापूर धरण 95 टक्के भरले असले तरी मराठवाड्यासाठी संजीवनी असलेले शंभर टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण जेमतेम 35 टक्के इतकेच भरले आहे. नाशिकमधील धरणातून मागील तीन महिन्यात केवळ नऊ टीएमसी पाणी जायकवाडिला पोहचले आहे. मेंढिगरी समितीच्या समन्यायी पाणी वाटप धोरणानूसार येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा नसेल तर नाशिक व नगरमधील धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. 

दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला जिल्ह्यातील धरणातील जलसाठा पाहून पाणी आरक्षण दिले जाते. त्या अगोदर सर्व पाणी वापर संस्थांनी त्यांची मागणी जलसंपदा विभाग व जिल्हाप्रशासनाकडे नोंदवायची असते. त्यानूसार महापालिकेने वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी सहा हजार दोनशे दलघफू पाण्याची मागणी नोंदवली होती. पण जिल्हासह जायकवाडीतील पाणीसाठा पाहता जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवत पाण्याचा वापर काटकसरीने करा अशा स्पष्ट सूचना देते पाणी कपातीची तयारी ठेवा असे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे.
 

Web Title: Be prepared for water cuts, Jalsampad has written a letter to the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक