शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:27+5:302021-02-06T04:24:27+5:30

दिल्लीत ७० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी व नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन ...

The bear movement to support the peasant movement | शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी धरणे आंदोलन

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी धरणे आंदोलन

Next

दिल्लीत ७० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी व नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी केंद्राच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. महसूल उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालक आपल्याच शेतात शेतमजूर होणार आहे, हे कायदे भांडवलदारांच्या हिताचे असून, शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दरात घेणार नाही, अशी कायद्यात तरतूद नाही, जमिनीचा ताबा व जमिनीचे अधिकार शेतकऱ्यांकडे राहणार नाही, करारानंतर कंपनीशिवाय इतरांना कृषी माल विकता येणार नाही, नाशवंत माल साठवणुकीची मर्यादा या कायद्यात उठविल्याने कॉर्पोरेट कंपन्या मोठे गोडाउन बनवून कृषी माल जतन करून ग्राहकांची लूट करतील. कराराचा भंग झाल्यास न्यायालयात जाता येणार नाही. स्वामिनाथन आयोग लागू करावा. हमी भावाचा कायदा करा. कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या धरणे आंदोलनात अशोक खालकर, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, भाऊसाहेब अरिंगळे, सुदाम बोराडे, तुकाराम पेखळे, गोरखनाथ बलकवडे, शिवाजी करंजकर, भास्कर गोडसे, जगन आगळे, बळवंत गोडसे, भास्कर सातव, रमेश धोंगडे, संतोष साळवे, प्रशांत दिवे, जगदीश पवार, नितीन खर्जुल, हरीश भडांगे, उत्तम कोठुळे, जयंत गाडेकर, अंबादास ताजनपुरे, विक्रम कोठुळे, श्रीराम गायकवाड, मसूद जिलानी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (फोटो ०४ शेतकरी)

Web Title: The bear movement to support the peasant movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.