अस्वली रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:05 PM2019-07-26T19:05:14+5:302019-07-26T19:05:39+5:30
इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या रस्त्यावरून धावणारी वाहने नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दोन वर्षापुर्वी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरील
पूल पावसामुळे बंद पडला होता. यामुळे या पुलावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आली आहे. यारस्त्यावर रहदारी वाढली आहे. परिणामी ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे.
नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली.परंतू या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून आजपर्यंत पुर्ण डांबरीकरण झालेले नाही. हा रस्ता पुर्ण का होत नाही ? तसेच कामाला सुरु वात झाल्यानंतर दोन दिवसात तात्पुरते डागडुजीकरण करून सदर रस्त्याचे काम बंद का केले जाते ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावेळी नागरिकांनीसांगितले.या रस्त्याने गोंदे औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार राञी अपराञी नोकरीस जात असतात.तसेच या रस्त्याने हिंस्ञ श्वापदांचा नेहमीच वावर असतो. या रस्त्याला वीजेची सोय नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी त्वरीत सदर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून नवीन कामास सुरूवात करावी अशी मागणी नांदूरवैद्यचे ग्रामस्थांनी केली आहे.