संवादातून उलगडली ‘आॅफ बीट भटकंती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:03 AM2017-08-07T01:03:56+5:302017-08-07T01:04:05+5:30
अलीकडच्या काळात पर्यटन लोकप्रिय होत चाललंय, ही आनंदाची बाब असली तरीही चाकोरीबद्ध पर्यटन करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि रसिक पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ‘आॅफ बीट भटकंती आणि बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
नाशिक : अलीकडच्या काळात पर्यटन लोकप्रिय होत चाललंय, ही आनंदाची बाब असली तरीही चाकोरीबद्ध पर्यटन करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि रसिक पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ‘आॅफ बीट भटकंती आणि बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे गंगापूररोड येथील कूर्तकोटी सभागृहात आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमातील द्वितीय पुष्प गुंफतांना जयप्रकाश प्रधान यांनी पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांबाबत माहिती तसेच पर्यटन करताना आलेले अनुभव यावेळी प्रेक्षकांसमोर सादर केले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधताना प्रधान यांनी ७५ देशांची भटकंती पूर्ण केली असून, महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाराष्ट्र दर्शन करणे आवश्यक असून, केवळ मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना भेटी देण्याऐवजी राज्याचा ग्रामीण भाग, कोकण, गडचिरोली, चंद्रपूर अशा भागांतही आवर्जून जायला हवे, असे आवाहन केले. यावेळी प्रधान यांनी हॉलंड, युरोप, स्विडन या देशांसह माल्टा बेट, आर्किक्ट सर्कल आदी परिसराचीदेखील माहिती देताना तेथील निवडक छायाचित्र स्लाइड शो द्वारे दाखविली. यावेळी माल्टा बेटाबद्दल सांगताना या बेटावरील निसर्गसौंदर्य, तेथील आल्हाददायक वातावरण तसेच याठिकाणी भारतीय खाद्यपदार्थांची हॉटेल्स असल्याचेही प्रधान यांनी आवर्जून सांगितले. आर्टिक्ट सर्कल येथील नैसर्गिक चमत्कार प्रत्येकाने अनुभवायला हवेत हे सांगताना येथील २४ तासांचा दिवस आणि २४ तासांची रात्र तसेच नॉर्दन लाइट्स या सूर्यावर होणाºया स्फोटकांमुळे आकाशात तयार होणाºया प्रकाश लहरी याबाबतही प्रधान यांनी माहिती दिली. ‘आॅफ बीट भटकंती’ यासह ‘बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना प्रधान यांनी पत्रकारिता करताना आलेले विविध अनुभव तसेच राजकीय, आर्थिक, गुन्हेगारी विभागात पत्रकारिता करताना प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांचीही माहिती यावेळी दिली. या व्याख्यानाप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, ज्येष्ठ पर्यटक विजय आव्हाड, शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी उपस्थित होते.