औषधांचे बिल मागितल्याने मेडिकल चालकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:55 PM2021-04-27T22:55:06+5:302021-04-28T00:43:57+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील मोरे कुटुंबातील तिघे जण लासलगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, संजीवनी मेडिकल येथून घेतलेल्या औषधांच्या बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेणे येथील मोरे यांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, रुग्णालयासमोरील संजीवनी मेडिकलमधून घेतलेल्या औषधांचे त्यांनी बिल मागितले असता मेडिकलचे संचालक गणेश फड यांना त्याचा राग आला. बिलामध्ये एक हजार रुपयांचा फरक असल्याने रुग्णांचे नातेवाईक व गणेश फड यांच्यात वादावादी होऊन मेडिकलमधील कामगारांसह पाच जणांनी मिळून मोरे यांना मारहाण केली तर एका महिलेला धक्काबुक्की केली असल्याचे मोरे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत देवीदास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेडिकलचे संचालक गणेश फड व इतरांवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश फड यांच्या पत्नीनेही याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी लासलगाव येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.