तमाशा कलावंतांना मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 07:50 PM2020-02-05T19:50:04+5:302020-02-05T19:51:01+5:30
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वाडीवºहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.

साकुर ता. इगतपुरी येथे सदोबा यात्रेनिमित्त तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा तमाशाचा फड लावण्यात आला होता. यात गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्र म संपवून सर्व कलावंत जेवण करण्यासाठी तंबूत परतले तर कामगार आवरा आवर करत असतांना गावातील काही युवक त्या ठिकाणी येत कार्यक्र म पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरू लागले. याचवेळी काही युवकांनी दारु च्या नशेत कलावंतांना मारहाण केल्याने गोंधळ उडाला. एका कलावंतास यात मार लागला असून त्यास पोलिसांनी नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर महिला कलावंतांची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवºहे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत तमाशा कलावंतांना सुखरूपपणे सुरक्षित स्थळी हलविले. याप्रकरणी चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.
साकुर ता.इगतपुरी येथील सुरू असलेला तमाशा रात्री बारा वाजता सुटल्यानंतर काही गाव गुंडांनी फडात येत पुन्हा गाणी म्हणा असे सांगितले व जोरदार मारहाण सुरू केली. महिला कलाकारांचा विनयभंग केला. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ती टिकली पाहिजे त्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत घेत असतो. परंतु अशा गावगुंडांनी येऊन त्रास दिला तर लोककला कशी टिकेल असा प्रश्न पडला आहे. या घटनेचा तमाशा परिषदेकडून जाहीर निषेध करीत आहोत.
- अविष्कार मुळे मांजरवाडीकर , अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद