घंटागाडी चालकाकडून मुलास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:09 AM2018-06-11T01:09:03+5:302018-06-11T01:09:03+5:30
सिडको : येथील प्रभाग २९ मधील दत्त चौकात रविवारी घंटागाडी चालकाने कचरा टाकण्यासाठी आलेल्या लहान मुलास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दत्त चौक परिसरात घंटागाडी (क्रमांक एमएच/१५/ एफव्ही/०९८४) नेहमीप्रमाणे आल्यावर परिसरातील नागरिक कचरा टाकण्यासाठी आले असता चालक अमृत कापसे याने येणाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका लहान मुलाने घंटा वाजवा असे सांगितल्याचा राग आल्याने चालक कापसे याने त्यास मारहाण केली. चालकाच्या ताब्यातून मुलाच्या आईने त्यास सोडविले. तरीदेखील चालक शिवीगाळ करीतच होता, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. सदर प्रकार नागरिकांनी नगरसेवक रत्नमाला राणे यांना कळविल्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षक व घंटागाडी सुपरवायझर यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मनपा कर्मचारी बाळासाहेब खैरनार व सुपरवायझर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला समज दिली.