बाजारसमितीत लोखंडी रॉडने मारहाण; म्हसरूळ घरावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:40 PM2020-07-19T17:40:40+5:302020-07-19T17:41:00+5:30

कुरापत काढून दगड फेकून मारहाण केली तसेच त्यानंतर रात्री पुन्हा संशयित खैरनार याच्या घरी आले व त्यांनी शिवीगाळ केली आणि दगडफेक केली

Beating in the market committee | बाजारसमितीत लोखंडी रॉडने मारहाण; म्हसरूळ घरावर दगडफेक

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्दे पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

नाशिक : मोबाईल फोन दिला नाही या कारणावरून कुरापत काढून तिघांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टाकळी परिसररात राहणाऱ्या नाना उर्फ राजेश भास्कर शार्दुल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शार्दुल यांनी दिलेल्या तक्रारी वरून फुलेनगर येथे राहणाऱ्या राजेश बत्तीशे उर्फ पवार व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या शुक्रवारी रात्री पेठरोड कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या एकविरा ट्रान्सपोर्ट समोर शार्दुल उभे असतांना संशयित पवार त्याठिकाणी आला व त्याने शार्दुल याच्याकडे मोबाईल मागितला मात्र शार्दुलने मोबाईल देण्यास टाळाटाळ केल्याने संशयितांनी डोक्यात लोखंडी रॉड मारून, शिवीगाळ व मारहाण केली.

पूर्ववैमनस्यातून घरावर दगडफेक
 पेठरोडवरिल ओंकारनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून सात ते आठ संशयितांनी घरावर दगडफेक करत चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ललित सोमनाथ खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरज चारोस्कर, नानू (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), मुन्ना गांगुर्डे, धुवारे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्यांच्या अन्य तीन ते चार साथीदारांनी चाणक्यपुरी सोसायटीच्या समोर अडवून संशयितांनी आमच्या बद्दल आकाशला काय सांगितले.
या कारणावरून कुरापत काढून दगड फेकून मारहाण केली तसेच त्यानंतर रात्री पुन्हा संशयित खैरनार याच्या घरी आले व त्यांनी शिवीगाळ केली आणि दगडफेक केली त्यात खैरनार याच्या बहिणीच्या ओठाला लागले म्हणून सिद्धांत शिंदे हा वाद मिटविण्यासाठी आला असता संशयितांनी सिद्धांत याच्या घरी जाऊन दगडफेक करत चारचाकी वाहनाचे नुकसान केले व जिन्याच्या काचा फोडल्या.

विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
 म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोड परिसरात राहणाऱ्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरकडच्या चौघांवर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मुलीचे वडिल सोमनाथ काशिनाथ अहेर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जानेवारी 2016 ते 17 जुलै 2020 कालावधीत अहेर यांच्या मुलीला तिचा पती अनिल पद्माकर गवळी तसेच सासर कडील अन्य तिघांनी त्या विवाहितेचा तुला स्वयंपाक येत नाही तू शोभत नाही, तुझ्या घरच्यांनी लग्नात मानपान दिला नाही व आमच्या प्रॉपर्टीला पाहून लग्न करून दिले असे म्हणून वारंवार तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरकडच्या मंडळीं कडून वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अहेर यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. अहेर यांच्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Beating in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.