पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 01:51 PM2021-08-19T13:51:32+5:302021-08-19T13:53:03+5:30

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

The beating of a petrol pump employee surrounded the three; Three were handcuffed by the police | पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्डेय तत्काळ पंपावर हजरपंपावर अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या सुचना

नाशिक : रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यु टाळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात ह्यनो हेल्मेट नो पेट्रोलह्ण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत पेट्रोल भरताना हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला हेल्मेट नसलेल्या चौघा दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन मारहाण करणाऱ्या संशयितांची ओळख पटवून तीघांना अटक केली आहे.

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.सोशलमिडियावरुन सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत संशयितांची ओळख पटवून संशयित मंगेश भास्कर पगारे (२६), मयुर त्र्यंबक देवकर (२५, दोघे रा.स्नेहनगर, म्हसरुळ) आणि अक्षय अविनाश जाधव (२६,रा.पेठरोड) या तीघांना बेड्या ठोकल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.

बंदोबस्तावरील पोलीस गायब
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या उपक्रमांतर्गत  हेल्मेट अनिवार्य केले आहे. विना हेल्मेट पेट्रोल दिले जाते की नाही याबाबत कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांची पंपांवर बंदोस्तासाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. म्हसरूळ शिवारातील ज्या पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली त्याठिकाणी पोलीस कर्मचारी त्यावेळी बंदोबस्तावर हजर नव्हते. जर पोलीस असते तर संशयितांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचे धाडस दाखविले नसते अशी चर्चा सुरु आहे.

पाण्डेय तत्काळ पंपावर हजर
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुन्हे शोधपथकाला तत्काळ आदेशित करत मारहाण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यास पाण्डेय यांनी सांगितले. पंपावर अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला केल्या आहेत.

Web Title: The beating of a petrol pump employee surrounded the three; Three were handcuffed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.