किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:34 PM2020-07-28T23:34:50+5:302020-07-29T00:57:04+5:30

नाशिकरोड : विहितगाव वीटभट्टीरोड येथे युवकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करून हत्याराने वार करून जखमी केले. बागुलनगर येथील प्रवीण संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

Beating a youth for petty reasons | किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण

किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण

Next
ठळक मुद्दे ७५ हजार रु पये किमतीचे सोन्याचे दागिने ओढून चोरून नेले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : विहितगाव वीटभट्टीरोड येथे युवकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करून हत्याराने वार करून जखमी केले. बागुलनगर येथील प्रवीण संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मित्र विजू सोनार याच्यासमवेत विहितगावला मामाकडे कामानिमित्त गेलो होतो. नंतर विहितगाव विटभट्टीरोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीची मिटिंग आटपून पुन्हा पायी घरी जात होतो. मारु ती मंदिराजवळ ओळखीचा मुलगा विकी शिराळ हा दुचाकीवर मागून येऊन तुम्ही जयंती का साजरी करता असे म्हणून कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. प्रवीणच्या कानामागे हत्याराने वार करून जखमी केले. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्याची पोत लांबविली
जेलरोड इंगळेनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत व मंगळसूत्र चोरट्याने ओढून चोरून नेले.
नांदूरनाका जनार्दननगर येथे राहणाऱ्या शोभा राजेंद्र भागवत यांनी फिर्याद दिली. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुलीसोबत मैत्रिणीला घेऊन जेलरोड इंगळेनगर हरिनमन अपार्टमेंट येथे कास्मेटिक खरेदीसाठी आलो होतो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून आम्ही उभे होतो. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी शोभा भागवत यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र व दीड तोळ्याची सोन्याची पोत असे ७५ हजार रु पये किमतीचे सोन्याचे दागिने ओढून चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केबलची चोरीएकलहरारोड इरीन रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आफिसर होस्टेल इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणावरून चोरट्याने २५ हजारांची पावर केबल चोरून नेली. विद्युत ठेकेदार नितीन अविनाश गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. इरीन येथे आफिसर होस्टेल इमारतीचे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी इमारतीच्या पोर्चमध्ये पावर केबल सप्लाय केबल ठेवलेली होती. चोरट्याने तेथून २५ हजारांची ४५ मीटरच्या दोन पावर केबल चोरून नेल्या.

Web Title: Beating a youth for petty reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.