कुकाणे ग्रामपंचायतीतर्फे मंदिर परिसराचे सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:26+5:302021-01-09T04:11:26+5:30
मालेगाव : तालुक्यातील कुकाणे येथील ग्रामपंचायततर्फे अशोक डापसे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पॅनल निवडणुकीत उतरविण्यात आले आहे. आदर्श पॅनलमधून वॉर्ड ...
मालेगाव : तालुक्यातील कुकाणे येथील ग्रामपंचायततर्फे अशोक डापसे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पॅनल निवडणुकीत उतरविण्यात आले आहे. आदर्श पॅनलमधून वॉर्ड क्रमांक १ मधून समाधान रामभाऊ पगारे (अनुसूचित जाती), वॉर्ड क्रमांक २ मधून शुभांगी संतोष शेवाळे (ओबीसी), वॉर्ड ३ मधून प्रभाकर गोविंद डापसे (सर्वसाधारण पुरुष) व हिरूबाई रामदास पगारे (सर्वसाधारण महिला), वॉर्ड क्रमांक ४ मधून संजय रामभाऊ अहिरे (सर्वसाधारण), सुनील धर्मा खैरनार (ओबीसी) उमेदवारी करीत आहेत. या पॅनलमधील शालीनी रमेश कुंवर, असरत दशरथ कुवर, जयश्री कैलास अहिरे, रखमाबाई रामदास खैरनार हे बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीत अद्वयआबा हिरे व प्रसाद हिरे मित्र मंडळ गटाची सत्ता आहे. या गटाने आदर्श पॅनलची निर्मिती केली असून, अशोक डापसे, विष्णू अहिरे, कैलास अहिरे नेतृत्व करीत आहेत. डापसे हे विद्यमान उप-सरपंच आहेत. कुकाणे ग्रामपंचायत निवडणुकीत २ हजार ४०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. डापसे यांच्या काळात अमरधाम येथे पेव्हरब्लॉक बसविले. रस्ते कॉंक्रीटीकरण केले. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यात आली. गावात हायमास्ट बसविले. जलशुद्धीकरण यंत्र बसविले. मराठी शाळेचे प्रवेशद्वार बनविले. वृक्षारोपण करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य दिले. मंदिर परिसराचे शुभोभिकरण करण्यात आले.
प्रतिक्रिया :
कुकाणे ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळताना गेल्या पाच वर्षात भरीव अशी विकास कामे केली असून, गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निवडणुकीत आदर्श पॅनल उतरविले आहे. भविष्यात ग्रामपंचायत डिजिटल करून सर्वांना बरोबर घेऊन विकास करायचा आहे.
- अशोक डापसे, आदर्श पॅनलचे नेते.
===Photopath===
080121\08nsk_13_08012021_13.jpg
===Caption===
आदर्श पॅनलचे नेते - अशोक डापसे