नागेश्वरी परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 04:14 PM2019-06-21T16:14:34+5:302019-06-21T16:14:43+5:30

सिन्नर : नागेश्वरी मंदिर शुभोभिककरण व विकासासाठी सिन्नर नगरपालिकेच्या फंडातून १२ लाख ६४ हजार निधी मधून हे काम पूर्णत्वास असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली.

Beautiful beautification in the area of Nageshwari | नागेश्वरी परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वाकडे

नागेश्वरी परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वाकडे

Next

सिन्नर : नागेश्वरी मंदिर शुभोभिककरण व विकासासाठी सिन्नर नगरपालिकेच्या फंडातून १२ लाख ६४ हजार निधी मधून हे काम पूर्णत्वास असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, एकनाथ लोंढे, चक्र पाणी झगडे, दशरथ लोंढे, प्रभाकर गोळेसर, सोमनाथ वाघ, किरण मिठे आदी उपस्थित होते. पुराणप्रसिद्ध नागेश्वर मंदिरही आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नाने प्रकाशझोतात येत आहे. शिवनदी आणि आजूबाजूचा झाडीचा परिसर यामुळे नागेश्वर मंदिर हे एक नैसिर्गक सुंदर ठिकाण आहे. नदीकिनाऱ्यावर घाट सुशोभीत करणे गरजेचे होते. याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात अशी बरीच वर्षांपासूनची मागणी होती. त्या अनुशंघाने नगरपालिकेने प्लेव्हर ब्लॉक, पिंडदान करण्यासाठी नदी किनारी पायºया, तसेच फरची बसविण्यात येत आहे, पिंडदान ओटा, कलर परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. दशक्रिया विधी करण्यासाठी येथे घाटाची सोय करण्याची अनेक दिवसांपासून होत होती. मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर शहरातील पौराणिक व निसर्गरम्य असे धार्मिक ठिकाण असलेल्या नागेश्वरी येथे पूर्वी दशक्रिया विधी होत असत. गेल्या ८ ते १० वर्षांपासून या भागात कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नसल्याने दशक्रिया होण्याचे बंद झाले होते. जेष्ठ नागरिकांनी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी केली होती .

Web Title: Beautiful beautification in the area of Nageshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक