उन्हाच्या तीव्रतेने उभी पिके कोमेजू लागल्याने
By admin | Published: October 8, 2014 12:09 AM2014-10-08T00:09:57+5:302014-10-08T00:34:27+5:30
उन्हाच्या तीव्रतेने उभी पिके कोमेजू लागल्याने
सिन्नर : तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पूर्वभागातील जलस्रोत ठणठणीत कोरडे आहेत. पाण्याची टंचाई, उन्हाच्या तीव्रतेने उभी पिके कोमेजू लागल्याने यंदा अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभाग व शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. तथापि, या नियोजनाला पावसाने खोडा घातल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर रोहिणी नक्षत्रात एकच पाऊस झाला त्यानंतर पावसाने जी ओढ दिली ती तब्बल दोन महिने राहिल्याने थेट श्रावणात पावसाला सुरुवात झाली.